बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

संगीत क्षेत्र दशा व दिशा
भारतिय संगीत! मग ते शास्त्रिय असो वा लोककला या प्रकारातील असो. आजवर बरच काही पाहीलय  या संगीताने भगवान श्रीकृष्णाची मधूर मुरली, गंधर्वांची गाणी, स्वामी हरिदासांची भजने धृपदे, मियाँ तानसेनचा गाता गळा ,अल्लादिया खाँ किंवा तत्कालिन भुलोकीच्या गंधर्वांचेही गायन, उस्ताद राशिद खाँ, पं रविशंकर, ऊ.झाकिर हुसैन,संगीत क्षेत्रातील जानी-मानी सब हस्तीयाँ चे गायन अगर वादन ऎकले व संगीत प्रसन्न झालेही असेल. की शास्त्रिय असो वा लोककला साधकांनी संगीताचा दिवा तेवत ठेवला.
बरे वेळोवेळी संगीताला जगवीण्याचे कार्य रसिकांनीही केले. धनवंत रसिकांनी आपले भांडार प्रसंगी मुक्तपणे उघडून कला व कलावंतांना सन्मानाने जगवले. राजाश्रय हा वेळोवेळी कमी अधिक मिळत गेला. हा झाला इतिहास!
आजचे काय? आज काय? लाँर्ड मेक्य़ाले च्या तन-मन कुजवत ठेवणार्‍या शिक्षण पद्धतीत आम्ही
जगतोच आहे. सर्व पालकांना त्यांची मुले डॉक्टर किंवा ईंजीनिअर करावयाची आहे.मग त्याची अगर तिची काय आवड आहे. याचा अजीबात विचार न करता. संगीत शिकावयास आलेली मुलं पहिल्या वर्षी शेकडो असतील तर कमीत कमी विशारद पर्यंत शिकणारी कितीशी मुलं असतात. असे का?विशारदच्या पुढे ही शिकत राहणारी मंडळी ही किती गाऊ शकतील? यातील कलाकार बनण्याची क्षमता असणारे किती? हा ही संशोधनाचा मुद्दा आहे.  याचा साकल्ल्याने आढावा घेतला तर आपणांस दिसून येते की पालकांना असे वाट्ते कि संगीत शिकुन काहीही फ़ायदा नाही.त्याने काय रोजगार थोडाच मिळणार आहे. बर्‍याच अंशी ते मनाला पटतं.
आज शाळा-महाविद्यालयात संगीत शिक्षकांच्या जागा सरकारने भरल्या नाही. सर्व स्तरावर  कारण तो विषय शिकवीण्याची गरज सरकारला वाटत नाही. जर बालपणापासूनच मुलं सांगितीक दृष्ट्या कमजोर राहीली तर चांगले रसिक तरी कुठून मिळणार? चांगले कलाकार कसे तयार होणार? खाजगी संगीत वर्गातून ठराविक ४-२ वर्ष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांतून, पाश्चात्य संगीताचे संस्कार (दुरचित्रवाणी संचाने केलेले) असलेली हि व येणा‍र्‍या पुढील पिढ्यांवर काय परिणाम होईल ते काळंच ठरवील.
             मात्र समाधानाची बाब की आज अ.भा.गा.म.च्या वतीने देशभरात विविध संगीत विद्यालयातून बर्‍यापैकी  विद्यार्थ्यांना संगीत विषयाचे आकलन होते आहे. छोट्या छोट्या मैफ़ीली विविध कलाकारांच्या होऊ लागल्यात.त्यायोगे ऎक आशादायक चित्र पुढे येत आहे. हे ही नसे थोडके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा